www.24taas.com, ठाणे
मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे ज्या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागत आहेत. त्या भागातल्या नागरिकांनाच पाण्यासाठी वणवण करावी लागतेय. शहापूर तालुक्यात भातसा धरण आहे त्याच्या आसपासच्या गावात पाण्याची तीव्र टंचाई आहे.
ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुक्यातल्या वाशाळा राईची वाडी गावातल्या नागरिकांना पाण्यासाठी अशी वणवण करावी लागत आहे. गावापासून दूर असलेल्या एका विहिरीमध्ये रात्रभरात अगदी थोडं पाणी येतं. एवढ्या पाण्यातच ५० घरं असलेल्या गावाची तहान भागते. मिळालेलं हंडाभर पाणीही स्वच्छ नसतं. तरीही दोन तीन वेळा गाळून हेच पाणी पिण्याशिवाय या नागरिकांसमोर पर्याय नाही.
जे भातसा धरण मुंबईकरांना मुबलक पाणीपुरवठा करतं त्या धरणाजवळच हे गाव आहे. तरीही इथल्या नागरिकांना वर्षोनुवर्ष पाण्यासाठी वणवण करावी लागते.