वाळूमाफियांचा तहसिलदारांवर हल्ला

राज्यात वाळूमाफियांचा हैदोस सुरुच आहे. वाळूमाफियांनी तहसिलदारांवर हल्ला केल्याची घटना रत्नागिरीत घडली आहे. चिपळूणच्या तहसिलदार जयमाला मुरुडकर यांच्यावर वाळूमाफियांनी हल्ल्याचा प्रयत्न केला. वाळूमाफियांविरोधात कारवाई करत असताना हा प्रकार घडला.

Updated: May 22, 2012, 01:57 PM IST

www.24taas.com, रत्नागिरी

राज्यात वाळूमाफियांचा हैदोस सुरुच आहे. वाळूमाफियांनी तहसिलदारांवर हल्ला केल्याची घटना रत्नागिरीत घडली आहे. चिपळूणच्या तहसिलदार जयमाला मुरुडकर यांच्यावर वाळूमाफियांनी हल्ल्याचा प्रयत्न केला. वाळूमाफियांविरोधात कारवाई करत असताना हा प्रकार घडला.

दाभोळ खाडीमध्ये वाळूमाफियांनी फावडे घेऊन तहसिलदारांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. ११० बोटींमधून अनधिकृत वाळू उपसा होत असल्यानं कारवाई करण्यासाठी तहसिलदार गेले असताना ही घटना घडली. एका ठिकाणी २३ बोटींना वाळू उपसा करण्याची परवानगी आहे. मात्र राजकीय वरदहस्तामुळे वाळूमाफिया कुणालाच जुमानत नसल्याचं चित्र आहे.

मागील तीन वर्षांपासून तहसिलदार जयमाला मुरूडकर वाळूमाफियांच्या विरोधात लढत आहेत. या आधीही त्यांच्यावर अनेकदा संघर्षाचे प्रसंग ओढावले आहेत. मात्र आता वाढता धोका लक्षात घेऊन त्यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.