www.24taas.com, कसारा
मुंबईकरांसाठी कालची रात्र अपघातांची ठरली. एकीकडे कसाऱ्याजवळ विदर्भ एक्स्प्रेसनं लोकलला धडक दिल्यानं १ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात १५ जण जखमी झाले आहेत. तर दुसरीकडे वडाळ्यात इस्टर्न फ्री वे या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा गर्डर कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. तर आठ जण जखमी झाले आहेत.
काल रात्री कसाऱ्याजवळ मोठी दुर्घटना घडली आहे. कसारा लोकल आणि विदर्भ एक्सप्रेसची टक्कर झाली. कसारा लोकल कसाऱ्याहून सीएसटीकडे येत होती. आणि विदर्भ एक्सप्रेस मुंबईहून नागपूरला जात होती.
कसारा लोकल रुळावरुन घसरली आणि बाजूच्याच ट्रॅकवर समोरुन विदर्भ एक्सप्रेस येत होती. त्याला कसारा एक्सप्रेसची धडक बसली. चार ते पाच डबे अपघातग्रस्त झाले. अंधार असल्यानं मदतकार्यात अडथळा येत होता. या अपघातामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.