www.24taas.com, बीड
बीडमध्ये स्त्री भ्रूणहत्येप्रकरणी काल अटक झालेल्या डॉक्टर शिवाजी सानप यांच्या पत्नी प्रिया सानप यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सानप यांच्या प्रिया मेडिकलमध्ये गर्भपातासाठीच्या इंजेक्शनची बेकायदा विक्री होत असल्याचं समोर आलेय. औषधांच्या नोंदीही योग्य पद्धतीनं ठेवण्यात आलेल्या नाहीत.
बीडमध्ये स्त्रीभ्रूण हत्येचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनानं जिल्ह्यातल्या मेडिकल दुकानावर छापे टाकायला सुरु केलीये. १२ औषध निरीक्षक आणि दोन सहआयुक्त मागील दोन दिवसांपासून बीडमध्ये तळ ठोकून आहेत. या तपासणीत लाखो रुपयांची विक्रेडील नावाची गर्भपातासाठी वापरण्यात येणारी इंजेक्शन विक्री झाल्याचं उघड झालं आहे.
सानप हॉस्पिटलमध्ये तीन स्त्रीभ्रूण हत्या झाल्याचं समोर आल्यानंतर, ही धडक कारवाई सुरु करण्यात आली. बीड शहरात नऊ तर परळीत तीन छापे टाकण्यात आले. डॉ.शिवाजी सानप यांच्या हास्पिटलमधील प्रिया मेडिकल मध्ये मोठ्या प्रमाणात गर्भपाताच्या इंजेक्शनची विक्री झाल्याचं समोर आलंय. कागदोपत्री इंजेक्शन होलसेल विक्रेत्याला परत केल्याचं दाखवण्यात आलं असलं, तरी ते दुकानातच होते. तसंच गर्भपातासाठी वापरल्या जाणा-या गोळ्याही आढळल्या आहेत.
व्हिडिओ पाहा..
[jwplayer mediaid="114477"]