www.24taas.com, बीड
स्त्री-भ्रूणहत्याप्रकरणानंतर वादाच्या भोव-यात अडलेल्या डॉ. सुदाम मुंडेंवरून आता राजकारण रंगू लागलंय. डॉ. मुंडें आणि माझे काहीही संबध नसून डॉ. मुंडे राष्ट्रवादीमध्ये गेल्याचे पुरावे भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी बीडमधल्या एका सभेत दाखवले.
आडनावातल्या साम्यामुळे माझी बदनामी झाल्याचं मुंडेंनी यावेळी सांगितलं. डॉ. मुंडे यांचा मुलगा व्यंकटेशनं राष्ट्रवादी प्रवेश केल्याची छायाचित्रही त्यांनी जाहीरपणे दाखवली. यात राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार, आ.सुरेश धस, आ. धनंजय मुंडे एकत्रित आहेत. व्यंकटेश मुंडे आणि आ. सुरेश धस यांची भागिदारी असल्याचंही खा. मुंडेंनी म्हणाले.
गोपीनाथ मुंडेंनी आक्रमक होत थेट पुरावाच दाखवल्यामुळे आता डॉ. सुदाम मुंडे प्रकरण आता राजकीय वर्तुळातही चांगलच चर्चेत राहण्याची शक्यता आहे.
डॉ. मुंडेचं 'राष्ट्रवादी' कनेक्शन