‘प्रणवदा’नंतर कोण?

प्रणव मुखर्जींची रायसिना हिल्सवरील राष्ट्रपती भवनाकडील वाटचाल निश्चित झाल्यामुळे आता लोकसभेत त्यांच्या जागी अर्थमंत्रालयाचा कारभार कोण सांभाळणार याची चर्चा सुरू झालीय.

Updated: Jun 16, 2012, 04:01 PM IST

 www.24taas.com, नवी दिल्ली 

प्रणव मुखर्जींची रायसिना हिल्सवरील राष्ट्रपती भवनाकडील वाटचाल निश्चित झाल्यामुळे आता लोकसभेत त्यांच्या जागी अर्थमंत्रालयाचा कारभार कोण सांभाळणार याची चर्चा सुरू झालीय.

२००४ साली प्रथमच लोकसभेवर निवडून येताच प्रणवदांच्या गळ्यात लोकसभा नेतेपदाची माळ पडली. आठ वर्ष त्यांनी ही जबाबदारी सक्षमपणे पार पाडल्यानंतर आता त्यांची पोकळी कोण भरून काढणार यांची उत्सुकता आहे. खुद्द पंतप्रधानच अर्थमंत्रालयाची सूत्रे आपल्या हाती ठेवू इच्छितात असं म्हटलं जातय. त्यांनी ही जबाबदारी दुस-या कुणाकडे सोपवण्याचं ठरवल्यास माँटेकसिंग अहलुवालिया, पी.चिदम्बरम, सी रंगराजन, आनंद शर्मा, जयराम रमेश  आणि सुशीलकुमार शिंदे यांची नावंही चर्चेत आहेत. तर लोकसभा नेतेपदाची सूत्र अधिकृतरित्या सोनिया गांधी यांच्या हाती जाण्याची शक्यता आहे.

.