राहुल गांधींचा पुतळा 'उलेमा'नं जाळला

उलेमा कौन्सिलच्या कार्यकर्त्यांसह काही तरुणांनी आज गुरुवारी येथील शिबिली नॅशनल महाविद्यालयासमोर आंदोलन करत कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांचा पुतळा जाळून निषेध केला. बाटला हाऊस जामियानगर येथील पोलीस चकमकीच्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, या मागणीसाठी हे तरूणांनी आंदोलन केले.

Updated: Jan 12, 2012, 05:44 PM IST

www.24taas.com ,आझमगड

उलेमा कौन्सिलच्या कार्यकर्त्यांसह काही तरुणांनी आज गुरुवारी येथील शिबिली नॅशनल महाविद्यालयासमोर आंदोलन करत कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांचा पुतळा जाळून निषेध केला. बाटला हाऊस जामियानगर येथील पोलीस चकमकीच्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, या मागणीसाठी हे तरूणांनी आंदोलन केले.

बाटला हाऊस येथे पोलिसांबरोबरच्या चकमकीत दोन कथित दहशतवादी मारले गेले होते. हा बनावट चकमकीचा प्रकार होता व बळी गेलेले तरुण निरपराधी होते, असा दावा करून कॉंग्रेसच्या दोन शिष्टमंडळांनी पंतप्रधानांकडे या प्रकाराची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने तरूणांनी संताप व्यक्त केला.

कौन्सिलचे कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी या आंदोलनाचे नेतृत्त्व केले. बाटला हाऊस प्रकरणाची जोपर्यंत चौकशी होत नाही, तोपर्यंत राहुल गांधी यांना आझमगडमध्ये प्रवेश करू देणार नाही, असा इशारा दिला होता, असे उलेमा कौन्सिल या संघटने सांगितले.

आझमगडची तरुण पिढी या चकमकीबाबत जाब विचारत असताना राहुल गांधी गप्प का, असा प्रश्‍न या वेळी उपस्थित करून  राहुल कौन्सिलच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, असा दावाही उलेमा कौन्सिलने या वेळी केला.