मेट्रो मॅन ई. श्रीधरन निवृत्त

दिल्लीच्या वाहतूक व्यवस्थेत क्रांतीकारक बदल घडवणारे ई.श्रीधरन हे दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे प्रमुखपदावरुन निवृत्त होत आहेत. श्रीधरन यांनी आपल्या सोळा वर्षांच्या कारकिर्दीत दिल्लीत जागतिक दर्जाच्या मेट्रो रेल्वेची उभारणी केली. ई.श्रीधरन यांनी दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनची धूरा १९९५ साली हाती घेतली तेंव्हा मेट्रो रेल्वे उभारणीचं आव्हान अशक्यप्राय कोटीतलं होतं ते त्यांनी प्रत्यक्षात उतरवलं.

Updated: Dec 31, 2011, 05:05 PM IST

 झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

 

दिल्लीच्या वाहतूक व्यवस्थेत क्रांतीकारक बदल घडवणारे ई.श्रीधरन हे दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे प्रमुखपदावरुन  निवृत्त होत आहेत. श्रीधरन यांनी आपल्या सोळा वर्षांच्या कारकिर्दीत दिल्लीत जागतिक दर्जाच्या मेट्रो रेल्वेची उभारणी  केली. ई.श्रीधरन यांनी दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनची धूरा १९९५ साली हाती घेतली तेंव्हा मेट्रो रेल्वे उभारणीचं आव्हान  अशक्यप्राय कोटीतलं होतं ते त्यांनी प्रत्यक्षात उतरवलं. श्रीधरन आज मेट्रो भवन इथे एका छोटेखानी समारंभात आपले  सहकारी मंगु सिंग यांच्याकडे दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनची सूत्रं सोपवतील.

 

मेट्रोच्या उभारणीपूर्वी दिल्लीत प्रवास करणं हे एक दिव्य होतं आणि तिथे ब्ल्यु लाईन नावाच्या बसेस या रोज होणाऱ्या अपघातांसाठी कुप्रसिध्द होत्या. दिल्लीतील रस्त्यांवरील रहदारी आणि वाहतूक कोंडीने प्रवाशांचे अतोनात हाल होतं असत, आज मेट्रोमुळे प्रवास सुसह्य झाला आहे. श्रीधरन यांनी अत्यंत नियोजनबध्द पद्धतीने काटेकोरपणे मेट्रोची उभारणी करुन दाखवली. सरकारी प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकतात हे त्यांनी सिद्ध करुन दाखवलं. श्रीधरन हे इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इंजिनिअर्सच्या १९८१ सालच्या बॅचचे अधिकारी आहेत.  श्रीधरन निवृत्तीनंतर आपल्या मुळ गावी केरळातील थिरुसर जिल्ह्यात स्थाईक होणार आहेत.