मुलीची छेडछाड, आणखी दोघांना अटक

आसाममधील गुवाहाटी येथे जमावाने मुलीला छेडछाड केल्याप्रकरणी पोलिसांनी आज रविवारी आणखी दोघांना अटक केली आहे. तसेच या प्रकरणी पोलीस उप-निरीक्षकालाही निलंबित करण्यात आले आहे.

Updated: Jul 15, 2012, 02:37 PM IST


www.24taas.com, गुवाहाटी

 

आसाममधील गुवाहाटी येथे जमावाने मुलीला छेडछाड केल्याप्रकरणी पोलिसांनी आज  रविवारी आणखी दोघांना अटक केली आहे. या घटनेला जबाबदार धरून पोलीस उप-निरीक्षकालाही निलंबित करण्यात आले आहे.

 

या प्रकरणात २० जण असल्याचे सांगितले जात  आहे. फरार असलेल्यांना अटक कधी करणार असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

 

मुलीला छेडछाड प्रकरणात दोघांच्या अटकेमुळे आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या सहावर पोहचली आहे. आणखी पाच जणांचा शोध घेण्यात येत आहे. यातील एकाची ओळख पटली आहे.

 

पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून दोषींना अटक करण्याची धडक कारवाई सुरु केली आहे. या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगानेही दबाव टाकला होता.आसामचे मुख्यमंत्री तरूण गोगोई यांनी या प्रकरणातील आरोपींना ४८ तासात पकडण्याची मुदत पोलिसांना दिली आहे.