मास्टर ब्लास्टरचा अनोखा विक्रम

सचिन तेंडुलकरने ड्रीम हाऊसमध्ये गृह प्रवेश केल्यानंतर त्याने आपल्या बांद्राच्या घराचा विमा उतरवला आहे. आणि विम्याची रक्कम आहे तब्बल १०० कोटी रुपये. आजवर सर्वाधिक विमा उतरवण्याचा विक्रम या विक्रमवीराने केला आहे. सचिनने जनरल इन्शुरन्स कंपन्यांच्या गटाकडून हा विमा उतरवला असल्याचं उद्योगातल्या सूत्रांनी सांगितलं.

Updated: Dec 29, 2011, 10:53 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई 

सचिन तेंडुलकरने ड्रीम हाऊसमध्ये गृह प्रवेश केल्यानंतर त्याने आपल्या बांद्राच्या घराचा विमा उतरवला आहे. आणि विम्याची रक्कम आहे तब्बल १०० कोटी रुपये. आजवर सर्वाधिक विमा उतरवण्याचा विक्रम या विक्रमवीराने केला आहे. सचिनने जनरल इन्शुरन्स कंपन्यांच्या गटाकडून हा विमा उतरवला असल्याचं उद्योगातल्या सूत्रांनी सांगितलं.

बांद्राच्या सचिन तेंडुलकरच्या घरासाठी तब्बल १०० कोटी रुपयांचे विम्याचे कवच कंपन्यांनी दिलं आहे. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, युनायटेड इंडिया इन्शुरन्स, न्यु इंडिया इन्शुरन्स आणि नॅशनल इन्शुरन्स या चार सरकारी कंपन्यांनी आणखी एका खाजगी कंपनीसोबत विमा उतरवला आहे.

सचिन तेंडुलकरला वर्षाला तब्बल ४० लाख रुपयांचा प्रीमियम त्यापोटी भरावा लागणार आहे. हा विमा दोन प्रकारचा आहे, त्यात फायर इन्शुरन्स म्हणजे आगीपासून संरक्षण देणारी वीमा पॉलिसी ७५ कोटी रुपयांची तर घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तु आणि क्रिकेटचे साहित्य यासाठी २५ कोटी रुपयांचे वीमा उतरवण्यात आला आहे. दहशतवादी हल्ला, आग तसेच भूकंप यामध्ये हानी झाल्यास भरपाई मिळण्याची तरतुद त्यात अंतर्भूत आहे. सचिन सप्टेबर महिन्यात बांद्रा इथे बांधलेल्या सहा हजार फूट घरात राहायला गेला. त्याआधी तिथे एक जूना बंगला होता तो सचिनने २००७ साली ३९ कोटी रुपयांना विकत घेतला होता. शाहरुख खानने देखील मन्नत या आपल्या घरासाठी ११० कोटी रुपयांचा तर मुकेश अंबानींनी अँटिलासाठी १५० कोटी रुपयांचा विमा उतरवला आहे.