माओवाद्यांनी केली अपहृत आमदाराची सुटका

बिजू जनता दलाचे आमदार जिन्हा हिकाका यांची आज गुरूवारी सुटका माओवाद्यांनी केली आहे. हिकाका यांची सुटका होण्यासाठी ओडिशा सरकारला मोठी किंमत मोजावी लागली आहे. हिकाका यांनी पटणामधील नारायण जंगलात सोडण्यात आले आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.

Updated: Apr 26, 2012, 09:26 AM IST

www.24taas.com, भुवनेश्वर

बिजू जनता दलाचे आमदार जिन्हा हिकाका यांची आज गुरूवारी सुटका माओवाद्यांनी केली आहे. हिकाका यांची सुटका होण्यासाठी ओडिशा सरकारला मोठी  किंमत मोजावी लागली आहे. हिकाका यांनी पटणामधील  नारायण जंगलात सोडण्यात आले आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.

हिकाका यांना सुटकेनंतर लगेचच आमदार पदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे. माओवाद्यांचे न्यायालय कोठे भरले होते, याबाबत माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, माओवाद्यांच्या न्यायालयात हिकाका यांना सोडण्याचा निर्णय़ घेतल्याचे हिकाका यांचे वकील निहार पटनाईक यांनी स्पष्ट केले होते.

हिकाका यांचे महिन्यापूर्वी कोरपूट जिल्ह्यातून अपहरण करण्यात आले होते. हिकाका यांना सोडण्यासाठी माओवाद्यांनी सरकारकडे केलेली मागणी सरकारने पू्र्ण केली आहे. त्यानुसार २५ माओवाद्यांना कारागृहातून सोडण्यात येणार आहे. यातील १३ जणांविरुद्ध दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात आले आहेत.