भारतीय संसद @ 60

भारतीय संसदीय लोकशाहीचा आज हीरक महोत्सव. साठाव्या वर्षात पदार्पण करत असलेल्या संसदीय लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी संसद भवन सज्ज झालं आहे.

Updated: May 13, 2012, 11:21 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

भारतीय संसदीय लोकशाहीचा आज हीरक महोत्सव. साठाव्या वर्षात पदार्पण करत असलेल्या संसदीय लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी संसद भवन सज्ज झालं आहे. या निमित्तानं संसदेच्या दोन्ही सभागृहात तसच संसदेच्या केंद्रीय सभागृहात यानिमित्तानं संसदीय लोकाशाहीच्या वाटचालीचा आढावा घेतला जाणार आहे.

 

साठ वर्षांपूर्वी १३ मे १९५२ साली स्वंतत्र भारतात संसदीय लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या संसदेची पहिली बैठक झाली होती. त्यानिमित्तानं आज संसद भवनात दिवसभर विशेष सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. सायंकाळी ५.३० वाजता राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील संसद सदस्यांना संबोधित करतील. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान मनमोहन सिंग आणि लोकसभा अध्यक्ष मीराकुमार हेदेखील यावेळी उपस्थितांना संबोधित करतील.

 

हीरक महोत्सवनिमित्त १९५२ ते १९५७ या दरम्यान पहिल्या लोसभेत बाह्य मणिपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले ९३ वर्षी रिशांग किशिंग, रेशमलाल जांगडे, कंडाला सुब्रमण्यम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे.

 

 

 

 

Tags: