भाजपचं ‘वेट अॅन्ड वॉच’

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठक आज भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या घरी आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीत कोणत्याही नावावर ठोस निर्णय झाला नसल्याचं, अडवाणी यांनी सांगितलंय.

Updated: Jun 15, 2012, 03:53 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठक आज भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या घरी आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीत कोणत्याही नावावर ठोस निर्णय झाला नसल्याचं, अडवाणी यांनी सांगितलंय. ते पत्रकारांशी बोलत होते.

.

नवी दिल्लीत झालेल्या एनडीएच्या या बैठकीत केवळ उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली. त्यामुळे सध्या तरी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेण्याचा पवित्रा सध्या तरी घेण्यात आलाय. बैठकीला भाजप अध्यक्ष नितीन गडकरी, सुषमा स्वराज, संयुक्त जनता दलाचे शरद यादव, शिवसेनेचे संजय राऊत उपस्थित होते. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवरून ममता आणि काँग्रेसमध्ये सुरू असलेला वाद एनडीएच्या पथ्यावर पडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जातेय.

.