दिल्ली IIT अध्यक्षपदी डॉ. विजय भटकर

ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांची दिल्ली आयआयटीच्या अध्यक्षपदी निवड झालीय. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी भटकर यांची नियुक्ती केलीय. विजय भटकर हे पद्मश्री पुरस्कारानं सन्मानीत आहेत.

Updated: May 2, 2012, 11:38 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांची दिल्ली आयआयटीच्या अध्यक्षपदी निवड झालीय. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी भटकर यांची नियुक्ती केलीय. विजय भटकर हे पद्मश्री पुरस्कारानं सन्मानीत आहेत.

आपलं शिक्षणही दिल्ली आय आय टी दिल्ली येथेच झाले असल्यानं  संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानं अतिशय आनंद होत असल्याची भावना विजय भटकर यांनी झी चोविसतासशी बोलताना व्यक्त केली.विजय भटकर यांची परम संगणककार अशीही ओळख आहे.जागतिक दर्ज्याच्या परम महासंगणकाची निर्मिती त्यांनी केली.

महासंगणकाची जेंव्हा भारताला गरज होती तेव्हा अमेरिकेनं ते भारताला देण्यास नकार दिला.तेंव्हा तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी विजय भटकर यांच्यावर ही कणीण जबाबदारी दिली.आणि त्यांनी ती सिध्दही केली. आज या संगणकाची जगभरातून मागणी होतेय. विजय भटकर यांचा अध्यात्माचाही मोठा अभ्यास असून विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालण्याचा ते प्रयत्न करत आहेत.आजच्या युगातील ज्ञानेश्वरीचा अर्थ हे पुस्तकही त्यांचं प्रसिध्द आहे.