झी २४ तास वेब टीम, जम्मू
दिल्ली उच्च न्यायालयाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाने जम्मू काश्मिरमधील किश्तवार येथून तीन मोबाइल जप्त केले आहेत.
या स्फोटप्रकरणी संशय असलेल्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्यांच्या घरातून हे मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी एका खास विमानाने किश्तवार येथे जाऊन वसीम अहमद याच्या घरातून हे मोबाइल जप्त केले आहेत.
वसीम हा बांगलादेशमधील उनानी वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे . वसीम हा हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वसीमला अटक करण्यापूर्वी आणखी तिघांना अटक करण्यात आली होती. दिल्ली उच्च न्यायालयाबाहेर ७ सप्टेंबरला झालेल्या बॉम्बस्फोटात १५ जण ठार झाले होते.