दिल्लीत बिल्डिंग कोसळून 3 ठार

दिल्लीतल्या उत्तम नगर भागात चार मजली बिल्डिंग कोसळून 3 जण ठार झाल्याची भिती व्यक्त केली जातेय.

Updated: Dec 3, 2011, 11:03 AM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

 

दिल्लीतल्या उत्तम नगर भागात चार मजली बिल्डिंग कोसळून 3 जण ठार झाल्याची भिती व्यक्त केली जातेय.

 

ढिगा-याखाली 10 जण अडकल्याची शक्यता आहे. इमारतीशेजारच्या बिल्डिंगमध्ये पायाभरणीचं काम सुरु असताना ही बिल्डिंग कोसळली. घटनास्थळी मदत कार्य वेगात सुरु आहे.