कोंडी फुटली, संसदेचं कामकाज सुरू

एफडीआयच्या मुद्यावर आज अखेर कोंडी फुटली. त्यामुळं नऊ दिवसांपासून ठप्प असलेलं संसदेचं कामकाज आजपासून सुरू झालं.

Updated: Dec 7, 2011, 07:46 AM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

 

एफडीआयच्या मुद्यावर आज अखेर कोंडी फुटली. त्यामुळं नऊ दिवसांपासून ठप्प असलेलं संसदेचं कामकाज आजपासून सुरू झालं.

 

सर्वसंमतीशिवाय एफडीआयला मंजुरी देणार नसल्याचं आश्वासन सरकारनं दिलंय. याबाबत अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी कामकाजाच्या सुरवातीला निवेदन करत सर्वसहमतीशिवाय एफडीआयला मंजुरी देणार नसल्याची घोषणा केली. विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं.

 

एफडीआयच्या मुद्यावर गेल्या नऊ दिवसांपासून संसदेचं कामकाज ठप्प झालं होतं. एफडीआयचा निर्णय रद्द करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. तर सरकारमधील तृणमूल काँग्रेस आणि डीएमके या दोन्ही घटक पक्षांनीही एफडीआयला तीव्र विरोध केला होता. त्यामुळं सरकारनं गेल्या आठवड्यात एफ़डीआयच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली होती.

मात्र तरीही विरोधकांनी थेट निर्यणच रद्द करण्याची मागणी केली होती. त्यामुळं कोंडी फोडण्यासाठी आज सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावून सर्वसमंतीशियवाय एफडीआयच्या निर्णयाला मंजुरी देणार नसल्याची घोषणा केली आणि ती विरोधकांनी मान्य केल्यामुळं अखेर कोंडी फुटली.