किंगफिशरची २० उड्डाणं रद्द

किंगफिशर एअरलाईन्सचा खेळखंडोबा चौथ्या दिवशीही सुरूच आहे. आज किंगफिशरची २० उड्डाणं रद्द करण्यात आलीय. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय.

Updated: Feb 21, 2012, 11:25 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

 

 

किंगफिशर एअरलाईन्सचा खेळखंडोबा चौथ्या दिवशीही सुरूच आहे. आज किंगफिशरची २० उड्डाणं रद्द करण्यात आलीय. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय.

 

 

काल जवळपास ४३उड्डाणं रद्द करण्यात आली होती.  किंगफिशर एअरलाईन्सच्या ५० पायलट्सनी या आठवड्यात राजीनामा दिलाय. त्यामुळे पुढचे काही दिवस तरी किंगफिशरचं कोणतंही विमान उड्डाण घेणार नाही अशीच स्थिती आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता उड्डाणं रद्द केल्याप्रकरणी किंगफिशर एयरलाईंन्सला आज DGCAसमोर हजर रहावं लागणारंय. प्राप्तीकर विभागानं किंगफिशर कंपनीची काही बँक खाती गोठविल्यानं कंपनीच्या विमान सेवांवर परिणाम झाला आहे.

 

 

केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयानंही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, प्रवाशांना किंगफिशरच्या या निर्णयाचा चांगलाच फटका बसतोय. केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री अजित सिंह यांनी किंगफिशर एअरलाइन्सला सरकारी बेल आऊट पॅकेज देण्यास साफ इन्कार केलाय. तसंच परिस्थिती सुधारावी यासाठी बँक आणि किंगफिशरशी चर्चा सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलंय.