झी २४ तास वेब टीम, पुणे
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना काल पुण्यातल्या संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं, काल त्यांची तब्येत जास्त बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण आता थोड्यावेळा पूर्वीच संचेती हॉस्पिटलमधील डॉक्टरच्या एका पथकाने अण्णा ठिक असल्याचे सांगितलं आहे.
अण्णांच्या सगळ्या टेस्ट करण्यात आल्या असून, हळूहळू तब्येतीत सुधारणा होत आहे. अण्णांच्या श्वासनलिकेला थोडीफार सूज असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे, तसचं अण्णा पुढील काही दिवस तरी संपूर्ण आरामाची गरज आहे. तसचं त्यांचा समर्थकांनी त्यांना जास्त भेटू नये असेही अण्णांनी सांगितले आहे.
तसचं अण्णांच्या उपोषणाबाबत डॉक्टरांना विचारल्यास त्यांनी अण्णांना किमान यापुढे १ महिना तरी उपोषण न करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे महिनाभर तरी अण्णांना सक्तीचा आराम करावा लागणार आहे.