'अण्णांची वारी' पुन्हा 'रामलीलाच्या दारी'???

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याची धमकीवजा इशाराच सल्ला दिला आहे. सक्षम लोकपाल बिल पारित न केल्यास येत्या 27 डिसेंबरपासून अण्णा पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Updated: Nov 27, 2011, 04:31 PM IST

झी 24 तास वेब टीम, नवी दिल्ली

 

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याचा धमकीवजा इशाराच दिला आहे. सक्षम लोकपाल बिल पारित न केल्यास येत्या 27 डिसेंबरपासून अण्णा पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

अण्णा पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याच्या तयारीत  आहेत.  जनलोकपाल बिल संमत न झाल्यास अण्णा  परत उपसणार उपोषणाचे हत्यार, अण्णांची पुन्हा एकदा उपोषणाची तयारी सुरू झाली आहे. यासाठी अण्णांनी  पोलिसांकडे उपोषणाची परवानगी मागितली  आहे. तसेच अण्णा हजारेंनी दिल्ली महानगरपालिकेकडे यासाठी  विचारणा  केलेली आहे,  27 डिसेंबरपासून रामलीला मैदान मोकळं आहे का? कारण की 27 डिसेंबरपासून अण्णा  उपोषणाला बसणार आहेत.

 

तसेच एमसीडीने या उपोषणाला परवानगी दिलेली आहे कारण की रामलीला मैदान हे 27 डिसेंबरपासून 5 जानेवारी पर्यंत मोकळं असल्याचे अण्णांना सांगण्यात आले आहे. जर का येत्या काळात जनलोकपाल बिल पारित न झाल्यास अण्णा पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. म्हणेजच सरकार आता पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. परंतु येत्या काळात सरकार अण्णांचे जनलोकपाल बिल पास करणार का? आणि जर का हे बिल पास न झाल्यास अण्णांची पुढीची खेळी काय असणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.