अडवाणींनी दिला महाजनांच्या आठवणींना उजाळा

लालकृष्ण अडवाणींनी प्रमोद महाजन यांचा उल्लेख संकटमोचक असा केला. जेव्हा काही पेचप्रचंग येतो तेव्हा प्रमोद महाजन यांची आठवण येते असं अडवाणींनी सांगितलं.

Updated: Dec 4, 2011, 05:02 PM IST

झी २४ तास वेब टीम, गुहागर

 

प्रमोद महाजन स्मृती भवनाच्या उदघाटन समारंभाच्या निमित्तानं गुहारगरमध्ये सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर आले होते. भाजप नेते लालकृष्ण अडवाणी आणि केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. कोकणच्या शैक्षणिक विकासासाठी योगदान देण्याचं आवाहन सर्वांनी केलं. तर लालकृष्ण अडवाणींनी प्रमोद महाजन यांचा उल्लेख संकटमोचक असा केला. जेव्हा काही पेचप्रचंग येतो तेव्हा प्रमोद महाजन यांची आठवण येते असं अडवाणींनी सांगितलं.

 

प्रमोद महाजन यांनी एनडीएचे सरकार सत्तेत असताना अनेकदा कठिण  प्रसंगी मार्ग काढला होता.  महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपा युतीचे शिल्पकार अशी महाजनांची सार्थ ओळख होती. शिवसेनेला सोबत घेण्याची व्युहरचना अचूक ठरली आणि १९९५ साली पहिल्यांदाच सेना-भाजपा युतीचे सरकार सत्तेत आले. पक्षासाठी निधी उभारणीच्या कामात महाजनांनी प्रमुख भूमिका बजावली होती. प्रमोद महाजनांच्या जाण्याने भाजपाचे अपरिमीत नुकसान झाल्याची प्रांजळ कबुलीच उडवाणींनी एक प्रकारे दिली.