www.24taas.com, यवतमाळ
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंच्या गाडीवर यवतमाळ जिल्हयात दगडफेक झाली. नेर जवळ ही घटना घडली. दगडफेकीची घटना घडली तेव्हा, ठाकरे यांच्यासोबत गाडीमध्ये पालकमंत्री नितीन राऊत होते.
शिवसेना आमदार संजय राठोड यांच्या गाडीतून दगडफेक झाल्याचा आरोप ठाकरेंनी केला आहे. विरोधकांनी काँग्रेसचा धसका घेतल्यानं दगडफेकीचा प्रकार घडल्याचं माणिकराव ठाकरेंचे पूत्र राहुल ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दगडफेक प्रकरणी शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[jwplayer mediaid="43130"]