नागपूरमध्ये शिवसेना ठरणार भाजपच्या वरचढ

नागपूर महापालिकेत भाजपनं शिवसेनेला डावलल्यानं आता जिल्हा परिषदेत शिवसेना महत्त्वाची पदं पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळं काठावर बहुमत असलेल्या भाजपपुढच्या अडचणी वाढल्या आहेत.

Updated: Mar 12, 2012, 09:29 PM IST

www.24taas.com, नागपूर 

 

 

नागपूर महापालिकेत भाजपनं महापौर आणि उपमहापौर ही दोन्ही पदे आपल्याकडं ठेवत शिवसेनेला धक्का दिला, मात्र आता जिल्हा परिषदेत शिवसेना त्याची कसर भरून काढण्याच्या तयारीत आहे.

 

उपाध्यक्षासह महत्त्वाच्या समित्या शिवसेनेला हव्या आहेत. जिल्हा परिषदेत काठावर बहुमत असल्यानं आता शिवसेनेला महत्त्वाची पदे देऊ अशी सारवासारव भाजप करु लागला आहे.

 

महापालिकेत महत्त्वाची पदे देताना भाजपनं डावलल्यानं नाराजी असल्याचं शिवसेनेच्या नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. जिल्हा परिषदेत महत्त्वाची पदे मिळाला हवीत अशी भावना शिवसेनेची आहे. नागपूर जिल्ह्यात भाजप दुय्यम वागणूक देत असल्याची सेना नेतृत्वाची भावना आहे. त्याचा परिणाम युतीतल्या संबंधांवर होतो आहे.