मराठी मालिकांसाठी सेना-मनसे सरसावली

दादासाहेब फाळके चित्रनगरी अर्थातच फिल्मसिटी येथे मराठी मालिकांना एकूण फीमध्ये ५० टक्के सवलत मिळत होती. पण अचानक ही सवलत बंद केल्याने मराठी मालिकांचे निर्माते अडचणीत आले आहेत.

Updated: May 28, 2012, 03:46 PM IST

 www.24taas.com, मुंबई

दादासाहेब फाळके चित्रनगरी अर्थातच फिल्मसिटी येथे मराठी मालिकांना एकूण फीमध्ये ५० टक्के सवलत मिळत होती. पण अचानक ही सवलत बंद केल्याने मराठी मालिकांचे निर्माते अडचणीत आले आहेत.

ही सवलत पुन्हा सुरु करावी म्हणून निर्मात्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी शिवसेनेनंदेखील आंदोलन छेडले आहे. तर मनसे चित्रपट सेनेने देखील मनसे स्टाईलने आंदोलन केले आहे. फिल्मसिटीत घोषणाबाजी करत शिवसेना कार्यकर्त्यांनी रद्द केलेल्या सवलतीविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला.

तर मनसे कार्यकर्तेही फिल्मसिटीमध्ये जाऊन घोषणाबाजी करीत होते. मराठी मालिकांसाठीही मोठमोठाले सेट उभारण्यासाठी मोठ्या जागेची गरज असते. त्यासाठी फिल्मसिटी योग्य जागा होती. मात्र आता सवलत रद्द केल्यानं सध्या असलेलं भाडं निर्मात्यांना परवडणार नसल्यानं त्यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.