एका लग्नाची दुसरी गोष्टमध्ये हनिमूनच काय?

एक लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत हनिमून टाळण्यासाठी घनाने एक खास प्लान आखला आहे. त्याचा हा प्लान नेमका आहे तरी काय आणि तो कितपत यशस्वी ठरला आहे.

Updated: Apr 8, 2012, 02:44 PM IST

www.24taas.com

 

एक लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत हनिमून टाळण्यासाठी घनाने एक खास प्लान आखला आहे.  त्याचा हा प्लान नेमका आहे तरी काय आणि तो कितपत यशस्वी ठरला आहे. काळेवाडीमध्ये एक धमाका होतो आणि यामुळे संपूर्ण काळे कुटुंब हादरतं. आणि सगळे पाहतात तर काय घनाच खुर्चीवरून पडलेला असतो.

 

घनाची अशी अवस्था पाहून सगळेच घाबरतात. घनाला तर हलताही येत नाही. आपली अशी अवस्था पाहून  आपल्याला डॉक्टरकडे नेण्यातं यावं असं घना घरच्यांना सांगतो. पायाला कदाचित फ्रॅक्चर झालं असावं अशी शंकाही तो व्य़क्त करतो. मात्र घनाचा पाय खरंच दुखावला नसून हनिमून टाळण्यासाठी घनाने रचलेला हा प्लान होता आणि हे खोटं जास्त खरं वाटावं यासाठी घना खोटे मेडिकल रिपोर्टही तयार करतो.

 

घरी गेल्यावर राधा हे रिपोर्ट घरच्यांना दाखवते. आणि घनाला आरामाची गरज असल्याचं देखिल सांगते त्यामुळे हा हनिमून रद्द करावा लागतो आहे हे देखिल त्यांना पटवून देते. एकूणच हनिमून टाळण्यासाठी घनाने हे नाटक तर रचलंय मात्र या नाटकात तो स्वत:च फसणार तर नाही ना? हे लवकरच कळेल.