२७ जुलैला दिसणार 'जिस्म-२'

सनी लिऑनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पॉर्नस्टार सनी लिऑनची पहिली बॉलिवूड फिल्म 'जिस्म-२' पूर्ण होत आली असून २ जूलै रोजी ती जगभरातल्या सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Updated: Jun 5, 2012, 02:37 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

सनी लिऑनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पॉर्नस्टार सनी लिऑनची पहिली बॉलिवूड फिल्म 'जिस्म-२' पूर्ण होत आली असून २ जूलै रोजी ती जगभरातल्या सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

जिस्म-२ सिनेमाशी संबंधित कएका मोठ्या व्यक्तीने एका मायक्रोब्लॉगिंग साइटवर या संदर्भात माहिती  देताना लिहिले, “ब्रेकिंग न्यूज- जिस्म-२ ठराविक दिवसाच्या एक आठवडा आधीच रिलीज होणार आहे. २७ जुलै २०१२ रोजीच आता जिस्म-२ प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे तुमचा पावसाळा खूप आनंददायी होईल.”

 

हा सिनेमा ३ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणर होता. मात्र, आता तो २७ जुलैलाच रिलीज होत आहे. त्यामुळे तापदायक उन्हाळ्यानंतर पावसाळ्यातही सनी लिऑन वातावरण ‘हॉट’ करणार आहे.