स्पर्म डोनेशन चांगलं काम आहे- रणबीर कपूर

स्पर्म डोनेशन (वीर्य दान) हे एक उत्तम समाजकार्य आहे, असं मत रणबीर कपूरने व्यक्त केलं आहे. “स्पर्म डोनेशन हे चांगलं काम आहे. तुम्ही त्याद्वारे दुसऱ्यांना मदत करत असता.” अशा शब्दांत रॉकस्टार रणबीरने स्पर्म डोनेशनचं महत्व मान्य केलं.

Updated: Jun 20, 2012, 10:53 PM IST

 www.24taas.com, मुंबई

स्पर्म डोनेशन (वीर्य दान) हे एक उत्तम समाजकार्य आहे, असं मत रणबीर कपूरने व्यक्त केलं आहे. “स्पर्म डोनेशन हे चांगलं काम आहे. तुम्ही त्याद्वारे दुसऱ्यांना मदत करत असता.” अशा शब्दांत रॉकस्टार रणबीरने स्पर्म डोनेशनचं महत्व मान्य केलं.

विकी डोनर हा सिनेमा हिट झाल्यापासून स्पर्म डोनेशनवर चर्चा सुरू झाली आहे. आयफा पुरस्कार सोहळ्यामध्येही शाहिद कपूरने रणबीर कपूरची स्पर्म डोनेशनवरून टर्र उडवली. शाहिद कपूरने रणबीरनेही स्पर्म डोनेशन करावं असा सल्ला दिला.

“शाहिदने जेव्हा मला स्पर्म डोनेशनचा सल्ला दिला, तेव्हा मी मंचाच्या मागे होतो. त्यामुळे स्पर्म डोनेट करू शकलो नाहीय पण शाहिदसाठी स्पर्म डोनेट करणं ही माझं आता प्रमुख काम असेल”असं रणबीर गमतीत म्हणाला.

शाहिद-रणबीरचा धमाल परफॉर्मंस ज्यांना पाहायचा असेल, त्यांना ७ जुलै रोजी स्टार प्लसवर आयफा पुरस्कार पाहाण्याची संधी मिळणार आहे.