www.24taas.com, मकाऊ
मकाऊच्या नयनरम्य वातावरणात रंगला झी सिने अवॉर्ड्सचा शानदार सोहळा. बॉलिवूडचे तारे इथे रेड कार्पेटवर अवतरले तर चिकनी चमेलीने सर्वांनाच घायाळ केले. पुरस्कारांची आतिषबाजी, कलाकारांची डान्समस्ती आणि खूप सारी धमाल पाहायला मिळाली ती म्हणजे झी सिने एवॉर्ड्स २०१२ मध्ये. अनेक सिने तारकांनी झी सिने अॅवॉर्ड्समध्ये बरीच धमाल मस्ती केली. या शानदार अॅवॉर्ड्सच्या रेड कार्पेटचा नजाराही शानदार होता.
जिंदगी ना मिलेगी दोबारा आणि डॉन -२ या दोन्ही फिल्म्सना नॉमिनेशन असल्यामुळे फरहान एक्सायटेड दिसत होता. तर सिंघममधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या काजलचं हे पहिलंच एवॉर्ड फंक्शन होतं.
तर बाजीराव सिंघमचा सुपर डुपर हिट ठरलेला विलन जयकांत शिक्रे यांने देखील या एवॉडर्स फक्शंनमध्ये हजेरी लावली. तर मिथुनदांनीही आपल्या अलग अंदाजात एण्ट्री केली. ब्युटिफुल बेब दिया मिर्झाही रेड कारपेटवर आर्वजून हजर होती. दुसरीकडे चिकनी चमेली आपल्या लटक्याझटक्यांनी घायाळ करायला सज्ज होतीच.
कतरिना डान्सनंबरच्या रिहर्सलमध्ये बिझी दिसली. चिकनी चमेली आणि शीला की जवानी या दोन्ही सुपरहिट आयटम साँगवर ती थिरकताना दिसणार आहे. त्यामुळे यंदाचा झी सीने एवॉर्ड्सचा रेड कारपेट इव्हेंट खूपच वेगळा होता. पण आता उत्सुकता वाढली आहे ती अॅवॉर्ड फंक्शनची. सो जस्ट वेट एण्ड वॉच.