सलमान-'ऍश'चे रेस्टॉरंट...

सलमान खानचा जिवलग मित्र फॅशन डियाझनर ऍशले रिबेलो हा एक जबरदस्त कूक आहे आणि तो सलमानसाठी स्वंयपाक देखील बनवतो. आता हे दोघे रेस्टॉरंट काढण्याचा विचार करताहेत.

Updated: Dec 4, 2011, 01:19 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

लागोपाठ एकाहून एक ब्लॉकबस्टर सिनेमा देणारा दबंग स्टार सलमान खान लवकरच फूड इंडस्ट्रीतही दमदार पदार्पण करण्याच विचार करत आहे. सलमान खानचा जिवलग मित्र फॅशन डियाझनर ऍशले रिबेलो हा एक जबरदस्त कूक आहे आणि तो सलमानसाठी स्वंयपाक देखील बनवतो. आता हे दोघे रेस्टॉरंट काढण्याचा विचार करताहेत. सलमानला ऍशलेच्या पाकसिध्दीवर फिदा आहे. सलमान गेले अनेक दिवस दिवस ऍशलेला स्वताचे रेस्टॉरंट काढण्याविषयी सांगत होता पण त्याने ते हसण्यावारी नेलं.

 

आता सलमाननेच सर्व गोष्टी आपल्या हातात घेतल्या आहेत आणि तो रेस्टॉरेटचं डेकॉर आणि मेनू कसं असावं याविषयी ऍशलेला मार्गदर्शन करत आहे असं एका सूत्राने सांगितलं. रेस्टॉरेटमध्ये फक्त मालवणीच नव्हे तर सर्वांसाठी खाद्यपदार्थांचे विविध पदार्थ उपलब्ध असतील. यासाठी एक तज्ञांची टीम काम करत असल्याचंही सूत्राचे म्हणणं आहे. ऍशलेला या बाबातीत विचारलं असता त्यानेही आम्ही दोघं रेस्टॉरंटसाठी एकत्र योजना आखत असल्याचं म्हटलं आहे. सलमानचे रेस्टॉरंट आहे म्हटलं की त्याचे चाहते नक्कीच गर्दी करतील. पण आपला चाहता हा सर्वसामान्य माणून आहे याचा विचार मोठ्या मनाचा सलमान करेल का आणि त्याला परवडतील असे दर असतील का हा खरा प्रश्न आहे.

Tags: