'सतरंगी रे' चा प्रीमिअर

आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'सतरंगी रे' या रॉक बॅण्डवर आधारित मराठी सिनेमाचा प्रीमिअर नुकताच पार पडला. यावेळी सिनेमाच्या टीमसह मराठी इंडस्ट्रीतले सेलिब्रिटीही उपस्थित होते.

Updated: Feb 9, 2012, 11:06 AM IST

मुग्धा देशमुख, www.24taas.com, मुंबई

आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'सतरंगी रे' या रॉक बॅण्डवर आधारित मराठी सिनेमाचा प्रीमिअर नुकताच पार पडला. यावेळी सिनेमाच्या टीमसह मराठी इंडस्ट्रीतले सेलिब्रिटीही उपस्थित होते.

म्युझिक हे पॅशन असलेल्या मित्रांची गोष्ट ‘सतरंगी रे’ या सिनेमात मांडण्यात आली आहे. संगीताचं स्वप्न घेऊन जगणाऱ्या कॉलेजिअन्सची ही कहाणी आहे. आदिनाथ कोठारे, भूषण प्रधान, सिद्धार्थ चांदेकर, सौमील शृंगारपुरे आणि पूजा सावंत यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत.

रॉक बॅण्डवर आधारित या सिनेमाचा प्रीमिअर नुकताच मुंबईत पार पडला. यावेळी सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होती. मराठी इंडस्ट्रीतल्या सेलिब्रिटीजनीही या प्रीमिअरला हजेरी लावली. तेव्हा ही 'सतरंगी रे' सिनेमाचा हा युथफूल म्युझिकल जर्नी प्रेक्षकांना आवडेल अशी आशा करूया.