www.24taas.com, नाशिक
नाशिकच्या भाजीपाला पिकवणा-या शेतक-यांनी मुंबईच्या कलाकारांना चांगलीच भुरळ घातली आहे. सेंद्रीय शेतीद्वारे पिकवला जाणारा हा भाजीपाला कौतुकाचा विषय ठरलाय. मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान, किरण राव, जॉकी श्राफ, रमेश देव अशी बॉलीवूडमधल्या अनेक स्टार मंडळींसह परदेशी नागरिकही या शेतक-यांच्या प्रेमात प़डलेत. दुष्काळी परिस्थितीवर मात करून या शेतक-यांनी आपला स्वतःचा खास ओर्ग्यानिक ब्रँडही विकसित केला आहे.
किरण राव ,जकी श्रॉफ, रमेशदेव, जर्मनीचे राजदूत काकड्या टॉमेटो खरेदी करतायेत...ते कुठल्या चित्रपटातील शुटींगसाठी नव्हे तर आपल्या घरातील किचनसाठी ... बाजार कुठला आहे हा... हा बाजार बांद्र्यातील भल्ला हाउस मध्ये भरत असला तरी बाजारातील भाजी विक्रेते आहेत नाशिकचे...कुठलीही रासायनिक खते, पेस्तिसाईद्सचा वापर न् करता गोमुत्र , शेणखत , तुळशीपाला आणि नैसर्गिक प्रतीरोधकानाचा वापर करून विषमुक्त भाजीपाला ते विकत आहेत ....येवला ,नाशिक ,दिंडोरी ,कळवण,निफाड,त्रिंबकेश्वर तालुक्यातील तीनशे शेतकर्यानी मिळून सेंद्रीय ग्रुप स्थापन केला असून ते दर रविवारी बांद्र्याला हा बाजार भरवितात. हेल्दी आणि हायजिनिक अन्नाचा वाढता वापर लक्षात घेऊन गेल्या तीन वर्षापासून हा उपक्रम राबवित आहेत.
यस्य बँकेचे चेअरमन, अनेक उद्योगपती, पाशचात्य देशातील राजदूत सेंद्रीय पद्धतीने पिकविणाऱ्या भाजीपाल्याला तिप्पटचौपट भाव देत आहे. या सर्व शेतकर्यांनी आपापल्या भागातील पाण्याची उपलब्धता बघून ,हवामान आणि नैसर्गिक जमिनीचे पोत बघून पिक वाटून घेतली आहेत. इकोसर्त या ओरगनिक प्रमाणपत्र घेऊन त्यांनी आतरराष्ट्रीय स्तरावर कुठेही उत्पादने विकण्याची परवानगी मिळवली आहे हे विशेष.
आमीरखानच्या निर्मिती कंपनीने या शेतकऱ्यांची खास दाखल घेतली असून त्यांच्या या परिश्रमांचा चाहता बनला आहे. त्यांच्यावर विशेष चित्रफीत तयार केली जात असून मुंबईच्या डबेवाल्यान्प्रमाणे सेंद्रीय शेती करणाऱ्या या शेतकऱ्यांच्या सामुहिक व्यवसायाचा देशभरात नावलौकिक होणार हे निश्चित