www.24taa.com, मुंबई
या वीकेण्डला अक्षयकुमारच्या रावडी राठोडची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे .तसंच आम्ही का तिसरे हा वेगळ्या धाटणीचा सिनेमा असे तीन मराठी सिनेमेदेखील प्रदर्शित होत आहेत .
विवेक ऑबेरॉय सलमानवर कुरघोडी करायचा एकही चान्स सोडत नाही याचा प्रत्यय पुन्हा आला. विवेकच्या आगामी शेर सिनेमाबद्दल विचारल्यावर त्याने शेर टायगरसे बडा होता है अशी सलमामवर टिप्पणी केली.
इम्रान हाश्मी शांघायमध्ये एका वेगळ्याच भूमिकेत दिसणारे. सिरियल किसर ही इमेज पुसण्यासाठी तो आगळ्या-वेगळ्या भूमिका साकारतोय. शांघाय हे त्याचं उत्तम उदाहरण आहे.
इशकजादे मध्ये भाव खाऊन गेलेला अर्जुन आता पुढच्या सिनेमात डबल रोलमध्ये दिसणारे. औरंगजेब या सिनेमात अर्जुन दुहेरी भूमिका साकारतोय. आता हे डबल आव्हान अर्जुन कसं हाताळतोय ते बघायचंय..
सूरज बडजात्याच्या आगामी सिनेमात सलमान काम करणार ही बातमी आम्ही आधीच तुम्हाला दिली होती. बडे भैया या बडजात्याच्या सिनेमात सलमानचा छोटा भाऊ म्हणून अर्जुन कपूरला घेण्याचा निर्मात्यांचा विचार आहे. तसं झालं तर अर्जुन की तो निकल पडी..
मराठी ता-यांची बॉलिवूड इनिंग आपल्याला काही नवीन नाही..धनश्री प्रधान, मराठी स्मॉल स्क्रीनवर झळकणा-या हया नवोदित चेह-यानं चक्क विधू विनोद चोप्राच्या फेरारीत सवार होण्याचा मान मिळवलाय. फेरारी की सवारी या सिनेमात धनश्रीनं एक छोटासा रोल कलाय.
नेहमीप्रमाणे मसाला सिनेमांना फाटा देत विकी डोनर, कहानी, पान सिंग तोमर फिल्मनी ऑफ बिट सिनेमाही कुछ कम नही असंच दाखवलंय. आणि आता यात भर पडतेय ती शिरीन फरहाद की तो निकल पडी य़ा सिनेमाची.
या वीकेण्डला अक्षयकुमारच्या रावडी राठोडची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे .तसंच विजय पाटकर निर्मित -दिग्दर्शित लावू का लाथ ही धमाल कॉमेडी, धागेदोरे, आणि आम्ही का तिसरे हा वेगळ्या धाटणीचा सिनेमा असे तीन मराठी सिनेमेदेखील प्रदर्शित होत आहेत.
रावडी राठोडच्या रावडी फॅमिलीत करीनाही सहभागी झालीय, करीनादेखील रावडी राठोडच्या धमाकेदार गाण्यात थिरकलीय.. तिचा हा डान्स प्रेक्षकांसाठी रावडी एन्टरटेन्मेंट देणारा ठरेल अशी आशा करूया.
बडे अच्छे लगते है मालिकेत बडा ट्विस्ट आलाय...रामने प्रियाला घटस्फोट द्यायला होकार दिलाय खरा पण त्याने ठेवलीय एक अट.. रामचा हा नवा डाव आहे तरी काय याचीचउत्सुकता लागलीये
डब्बा गुल या कॉमेडी शोमध्ये अवतरलीय शाळा.. आणि तीसुद्धा उन्हाळी सुट्टीसाठीची स्पेशल शाळा.. या शाळेतल्या मास्टरांनी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी भरपूर धमाल केलीये..