www.24taas.com, मुंबई
फिल्मी फ्रायडेला ‘पानसिंग तोमर’, ‘लंडन पॅरीस न्यूयॉर्क’ आणि ‘विल यू मॅरी मी’ या तीन हिंदी फिल्म्स आणि ‘मॅटर’ हा एकमेव मराठी सिनेमा प्रदर्शित झालाय.
‘पानसिंग तोमर’ ही राष्ट्रीय खेळांमध्ये नाव कमवलेल्या एथलिटची सत्यकथा आहे. गरीब घरातून आलेल्या पानसिंगचा एथलिट ते विद्रोही प्रवास सिनेमात मांडण्यात आला आहे. इरफान खान आणि माही गिल यांचा पानसिंग तोमर परभावी सिनेमा आहे.
'लंडन पॅरीस न्यूयॉर्क' ही रोमॅण्टिक कॉमेडी फिल्मही रिलीज झाली. अली जफर आणि आदिती रावची हटके जोडी प्रेक्षकांना आवडलेली दिसत आहे. ‘विल यू मॅरी मी’ ही आणखी एक कॉमेडी फिल्मदेखील प्रदर्शित झालेय.श्रेयस तळपदे, मुग्धा गोडसे,राजीव खंडेलवाल ही कास्ट यात झळकतेय.
मराठीत ‘मॅटर’ हा एकमेव मराठी सिनेमा प्रदर्शित झाला. गुन्हेगारीवर भाष्य करणाऱ्या ‘मॅटर’मध्ये जितेंद्र जोशी, संतोष जुवेकर, राजेश शृंगारपुरे सुशांत शेलार अशी दमदार स्टारकास्ट झळकत आहे. पहिल्या दिवशी ‘मॅटर’ला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.