पूनम पांडेपुढे बिपाशाचं नमतं

पूनम पांडेच्या ट्विटरवरील फोटोंपुढे आणि वक्तव्यांपुढे भल्याभल्यांनी तौबा केलं त्यात आता बिपाशा बासूचाही नंबर लागला आहे. यापूर्वी कुणीही कुठलंही वक्तव्य केलं, तरी पूनमची त्यावर टिप्पणी असायचीच.

Updated: Jul 17, 2012, 10:53 PM IST

www.24taas.com, मुंबई 

 

पूनम पांडेच्या ट्विटरवरील फोटोंपुढे आणि वक्तव्यांपुढे भल्याभल्यांनी तौबा केलं त्यात आता बिपाशा बासूचाही नंबर लागला आहे. यापूर्वी कुणीही कुठलंही वक्तव्य केलं, तरी पूनमची त्यावर टिप्पणी असायचीच. त्यावर कुणी वाद घातला, तर पूनम कुठल्या पातळीवर जाऊन प्रतिवाद करेल, याची लोकांना आता चांगलीच कल्पना आली असेल. नुकताच याचा प्रत्याय बिपाशाला आला.

 

बिपाशा बासूचं जॉन आब्रहमबरोबर असलेले संबंध 10 वर्षांनी संपुष्टात आले. या नंतर एका दैनिकाशी बोलताना बिपाशा म्हणाली होती, “सगळेच पुरूष हे ‘लूजर’ असतात.” तमाम पुरूष मंडळींबद्दल असं वाक्य बोलल्यावर कुठल्याही पुरूषानेदेखील यावर आपली प्रतिक्रिया नोंदवली नव्हती. मात्र, पूनम पांडेने लगेच ट्विटरवर बेधडक विधान करून बिपाशाची गोची केली.

 

पूनम पांडेने ट्विटरवर लिहीलं, “तू युष्यात कायम लूजर्सच निवडलेस, याचा अर्थ असा नाही की जगातले सगळेच पुरूष लुख्खे असतात.” एवढं बोलून पूनम थांबली नाही, तर तीपुढे जाऊन असंही म्हणाली, “दशकभर बॉलिवूडमध्ये काम करूनदेखील या अभिनेत्रीचं ‘समाधान’ झालेलं नाही. मग नक्की ‘लूजर’ कोण हे सहज स्पष्ट होतं?”

 

पूनमच्या ट्विटवर आधी मौन बाळगून असलेल्या बिपाशाने अखेर आपल्य़ा टॉविटरवर स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे, “माझं विधान सगळ्या पुरूषांबद्दल नव्हतं. मला पुरूष आवडतात. माझे बहुसंख्य मित्र हे पुरूषच आहेत. मला माझ्या वक्तव्यावर स्पष्टीकरण द्यावं लागतंय, याचं मला वाईट वाटतंय. ते सगळ्या पुरूषांबद्दल केलेलं विधान नव्हतं.”