www.24taas.com, गुडगाव
हरियाणातील गुडगाव येथे सीआरपीएफ कादरपूर शूटिंग रेंजवर १०० मीटर रायफल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेला अभिनेता नाना पाटेकर यांने सेट्टीबाजीवर बॅटींग केली. नानाने गुगली टाकत सांगितले, सरकराने सट्टेबाजी रोखण्यासाठी ती अधिकृत केलेली बरी.
क्रिकेटच्या तुलनेत इतर खेळांमध्ये सट्टेबाजीचे प्रमाण अत्यल्प आहे. सट्टेबाजी करणा-या छोट्या लोकांना पोलीस पकडून नेतात, पण मोठे मासे अलगद निसटून जातात. सध्या देशात क्रिकेट लोकप्रियतेच्या शिखरावर असून याचे काही अंशी श्रेय सट्टेबाजीला जात असल्याचे ते म्हणाले.
क्रिकेटसह खेळांवरील सट्टेबाजी थांबवण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी सट्टेबाजीला आळा बसणार नाही. त्यामुळे सरकारने सट्टेबाजी अधिकृत करावी. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे माजी अध्यक्ष एहसान मणी यांनी भारत सट्टेबाजीचे सर्वात मोठे केंद्र असल्याचे केलेले विधान योग्य आहे. सट्टेबाजी अधिकृत केल्यास त्यामुळे क्रिकेटसह सर्वच खेळांना फायदा होईल व सरकारलाही चांगले उत्पन्न मिळू शकेल, असे नाना म्हणाला. नानाने नेमबाजी स्पर्धेत ६०० पैकी ५३२ गुण मिळवले.