'देऊळ' दर्शनाला खुले

या आठवड्यात बॉक्स ऑफीसवर एक मराठी आणि चार हिंदी फिल्म्स रिलीज होत आहेत. उमेश कुलकर्णीचा बहूचर्चित देऊळ तर हिंदीत लूट, मिले ना मिले हम, ना जाने कबसे आणि टेंशन दूर या लो बजेट फिल्म्स रिलीज होत आहेत.

Updated: Nov 3, 2011, 11:05 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

या आठवड्यात बॉक्स ऑफीसवर एक मराठी आणि चार हिंदी फिल्म्स रिलीज होत आहेत. उमेश कुलकर्णीचा बहूचर्चित देऊळ  तर हिंदीत लूट, मिले ना मिले हम, ना जाने कबसे आणि टेंशन दूर या लो बजेट फिल्म्स रिलीज होत आहेत.

 

उमेश कुलकर्णीने उभारलेल्या देवळात जायची संधी या शुक्रवारी प्रेक्षकांना मिळणार आहे. कारण उमेशचा बहूचर्चित देऊळ हा सिनेमा या विकेन्डला रिलीज होत आहे. देवळाभोवती फिरणारं राजकारण हा विषय या सिनेमात मांडण्याचा प्रयत्न उमेशने केलाय. नाना पाटेकर, नसरुद्दिन शहा, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, अतिषा नाईक ही तगडी स्टारकास्ट या सिनेमाचा युएसपी. विशेष म्हणजे उमेश स्टाईल सिनेमात पहिल्यांदाच आयटम साँग बघण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. सामाजिक विषयावर भाष्य करणारी देऊळ ही फिल्म आहे.वळू,विहीर नंतर उमेश-गिरीश या जोडीची ही तिसरी फिल्म आहे.

 

या मराठी सिनेमाबरोबरच गोविंदा, जावेद जाफरी, सुनील शेट्टी, राखी सावंत ही स्टारकास्ट पोट धरुन हसवायला थिएटरमध्ये दाखल होतेय ते 'लूट' सिनेमा घेऊन. शिवाय रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवानही सिल्व्हर स्क्रीनवर पदार्पण करायला रेडी झालाय. चिराग मेन लीडमध्ये असलेला 'मिले ना मिले हम' हा सिनेमा शुक्रवारी रिलीज होतोय. या सिनेमांबरोबर 'ना जाने कबसे' आणि 'टेंशन दूर या लो' बजेट फिल्म्सही रिलीज होत आहेत.

 

एकंदरीतच या विकेन्डला रिलीज होणाऱ्या फिल्म्सवर नजर टाकली असता या विकेन्डला प्रेक्षकांनी उमेशच्या देवळात जायला काहीच हरकत नाही. आणि हिंदीत या चार सिनेमांपैकी एक ऑप्शन ट्राय करायचा असेल तर गोविंदा आणि सुनील शेट्टीने केलेली 'लूट' बघायला काहीच हरकत नाही. 

Tags: