जॉनचे 'फोर्स'फुल प्रमोशन

Updated: Dec 16, 2011, 12:51 PM IST

वॉन्टेड,  सिंघम, बॉडीगार्ड नंतर  फोर्स हा आणखी एक तामिळचा हिंदी रिमेक असणारा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. बॉलीवूडचा मॅचोमॅन  जॉन अब्रहम या सिनेमात प्रमुख भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. या 'फोर्स' सिनेमातील त्याचा पिळदार शरीर, सिक्स पॅक अ‍ॅब्ज आणि टॅटू  असा लूक आधीच तरुणांमध्ये लोकप्रिय होऊ लागला आहे. या लूकसाठी जॉनने खूप मेहनत घेतली आहे. वर्याकआऊट केलं आहे. या सिनेमाचं प्रमोशनही जॉन ने नुकतंच एका जीममध्ये जाऊन केलं.

Tags: