जेव्हा सनी 'जिस्म२च्या ' सेटवर 'नाहाते'...

सनी लिऑनसंदर्भातील बातमी म्हणजे हॉट असणारच.. तर आता, जिस्म २ च्या शुटिंगला सुरूवात झाली आहे. जिस्म-२चं पहिलं शेड्युल जयपूर येथे आहे. जयपूरचं वातावरण सध्या उन्हाळ्यात चांगलंच गरम आहे आणि त्यात सनी लिऑनसारखी हॉटी या शहरात जिस्म-२ चं शूट करतेय.

Updated: Apr 5, 2012, 03:35 PM IST

www.24taas.com, जयपूर

 

सनी लिऑनसंदर्भातील बातमी म्हणजे हॉट असणारच.. तर आता, जिस्म २ च्या शुटिंगला सुरूवात झाली आहे. जिस्म-२चं पहिलं शेड्युल जयपूर येथे आहे. जयपूरचं वातावरण सध्या उन्हाळ्यात चांगलंच गरम आहे आणि त्यात सनी लिऑनसारखी हॉटी या शहरात जिस्म-२ चं शूट करतेय, म्हणजे तिथलं वातावरण किती तापलं असेल, याची कल्पनाच केलेली बरी!

 

आपल्या पहिल्या वहिल्या बॉलिवूड पदार्पणासाठी सनी इतकी एक्साइट झालेली आहे, की आपण कुठेही कमी पडू नये यासाठी मेहनत घेत आहे. आपलं हिंदी, अभिनय, केशरचना, मेक-अप अशा प्रत्येक गोष्टीकडे ती लक्ष देतेय. जयपूरच्या रणरणत्या उन्हात शूट केल्यावर आपली रापलेली त्वचा पुन्हा सुंदर बनवण्यासाठी सनीने सरळ अंघोळीचा मार्ग स्वीकारला.

सनीने आपला हा गरम पाण्याने अंघोळ करताना काढलेला फोटो तिने एका मायक्रो ब्लॉगिंग साइटवर अपलोड केला आहे. जिस्म २चं शुटिंग सनी खूप जास्तच एंजॉय करतेय, हे त्यावरून जाणवतंच आहे. सिनेमाची संपूर्ण कास्ट अँड क्रू माझे खूप लाड पुरवतेय, मी माझे सह कलाकार रणदीप हूडा आणि दिनो मोरियाबरोबर खूप धमाल करतेय, अशी वक्तव्यंही तिने ट्विटरवर केली आहेत.

 

जिस्म २ मध्ये काम करणं म्हणजे माझी स्वप्नपूर्ती आहे, असं सनी म्हणाली आहे. ज्या सिनेमाच्या पहिल्या शेड्यूलमध्ये असे हॉट फोटोज पाहायला मिळतायत, त्या फिल्ममध्ये काय काय पाहायला मिळणार असेल, हे ते ‘भट्ट’च जाणे!!