झी २४ तास वेब टीम, मुंबई
' पुनश्च हनिमून ', ' प्रिया बावरी', ' तिची १७ प्रकरणे ' या गाजलेल्या मराठी नाटकांसह हिंदी आणि इंग्रजी भाषेतील दर्जेदार नाटकांचा महोत्सव येत्या१९ ते २६ सप्टेंबर याकालावधीत वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये होत आहे . सेंटरच्या सांस्कृतिक विभागातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या राष्ट्रीय स्तरावरील महोत्सवाचे यंदा १५वे वर्ष आहे .
महोत्सवाची सुरुवात १९सप्टेंबरला सायं . ७ . ३० वाजता नादिरा बब्बर यांच्या ' पेन्सिल से ब्रश तक ' या नाट्यविष्काराने होईल . दिवंगत चित्रकार एम . एफ . हुसेन यांच्या आत्मकथनावर हे नाटक आधारित आहे . २० सप्टेंबरला सायं . ७ . ३० वाजता हबीब तन्वीर यांचे 'गांव के नाव ससुराल , मोर नाव दामाद ', २१ तारखेला सायं . ७ . ३० वाजता जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या तीन लघुकथांवर आधारित ' बाय जॉर्ज ' सादर होणार असून नसिरुद्दिन शाह यांची प्रमुख भूमिका आहे . केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद लिखित ' सन्स ऑफ बाबर ' या इंग्रजी नाटकाचे रुपांतर असलेले ' बाबर की औलाद ' हे हिंदी नाटक२२ तारखेला सायं . ७ . ३० वाजता होईल .
२३ सप्टेंबरला दुपारी २ . ३० वाजता प्रदीप वैद्य रुपांतरित ' आसक्त , पुणे 'संस्थेच्या ' तिची १७ प्रकरणे ', सायं . ७ . ३०ला बहुभाषिक ' भारतकथा ' सादरहोईल . २४ सप्टेंबरला दुपारी २ . ३० वाजता प्रा . वामन केंद्रे दिग्दर्शित ' प्रियाबावरी ', सायं . ७ . ३० वाजता म . गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांच्यातीलपत्रव्यवहारावर आधारित नाट्यविष्कार ' दि प्रोफेट अॅण्ड दि पोएट ', २५ सप्टेंबरलादुपारी २ . ३० वाजता संदेश कुलकर्णी लिखित - दिग्दर्शित ' पुनश्च हनिमून ', सायं .७ . ३० वाजता टागोरांच्या कथेवर बेतलेले ' चंडालिका ' नाटक होईल . महोत्सवाची सांगता २६ सप्टेंबरला ' इप्टा ' निर्मित ' आखरी शमा ' या नाटकाने होईल .