नाशिक : बातमी 'झी २४ तास' बातमीच्या इम्पॅक्टविषयी... राज्यातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील १५४ पीएसआयपैंकी १४८ जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ ऑक्टोबर रोजी १५४ पीएसआयना सामावून घेत आहोत, अशी घोषणा करुनही त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नव्हती. मॅटच्या निर्णयानंतर १५४ जणांना मूळ पदावर पाठवण्याची जी तत्परता दाखवली, तीच तत्परता नियुक्ती देण्याबाबत दाखवली जात नसल्याने दिवाळी साजरी होऊ शकली नव्हती. मात्र, अधिवेशनाच्या तोंडावर सरकारने अखेर मंगळवारी सर्वाना नियुक्तीपत्रे देत दीडशे कुटुंबाचे तोंड गोड केलंय.
अधिक वाचा : - नऊ महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर... नियुक्ती पत्राऐवजी हाती नियुक्ती रद्दीचं पत्र!
यापूर्वी, १५४ पोलीस उपनिरीक्षकांची एमपीएससीतर्फे घेण्यात आलेली परीक्षा ही पदोन्नतीसाठी नव्हती तर ती सरळसेवा भरतीसाठी होती, असं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनं 'मॅट'मध्ये सादर केलं होतं. १५४ पोलीस उपनिरीक्षकांना दिलेल्या आश्वासनांप्रमाणे त्यांची नियुक्ती पोलीस उप-निरीक्षक पदावर करत असल्याचे सरकारनं मान्य केलं होतं.