कस्टडीत मृत्यू प्रकरणी पाच पोलिसांचे निलंबन

 कस्टडीत विजय सिंग या 26 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्यानंतर प्रचंड गदारोळ

Updated: Nov 1, 2019, 04:08 PM IST
कस्टडीत मृत्यू प्रकरणी पाच पोलिसांचे निलंबन  title=

मुंबई : वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस ठाण्याच्या कस्टडीत विजय सिंग या 26 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्यानंतर प्रचंड गदारोळ झाला होता. मयत विजय सिंग याच्या नातेवाईकांनी पोलीस कस्टडीत मारहाणीत विजयचा मृत्यू झाल्याचा आरोप केल्यानंतर यासंदर्भात पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. 

यानंतर महाराष्ट्र हा देशात पोलीस कस्टडीत मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये पहिल्या क्रमांकावर असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात सुमोटो दाखल करावा आणि निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका एड. अरविंद तिवारी यांनी केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या सुट्टी कालीन न्यायालयात न्यायमूर्ती तातडे यांच्या खंडपीठासमोर ही याचिका दाखल करण्यात आली होती. ज्यावर सुनावणी होत जस्टीस तातडे यांनी ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रदीप नंदराजोग यांच्या खंडपीठासमोर  पाठवली आहे. येत्या 4 नोव्हेंबर रोजी या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.