लव्ह जिहादमध्ये राज्यातून बेपत्ता मुलींचा शोध घेणार; महिला आणि बालविकासमंत्र्यांची घोषणा

श्रद्धा वालकर प्रकरणात लव्ह जिहादचाही आरोप केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या गायब झालेल्या मुलींचा शोध घेतला जाणार असल्याचे लोढा यांनी जाहीर केले आहे.

Updated: Nov 19, 2022, 03:57 PM IST
लव्ह जिहादमध्ये राज्यातून बेपत्ता मुलींचा शोध घेणार; महिला आणि बालविकासमंत्र्यांची घोषणा title=

Love jihad, मुंबई : दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडांमुळे(Shradhha Murder Case ) देशात खळबळ उडाली. श्रद्धाच्या प्रियकाराने तिती हत्या करुन तिचे 35 तुकडे केले आहेत. श्रद्धा महाराष्ट्रात राहणारी आहे. श्रद्धाच्या हत्याकांडांबाबत लव्ह जिहादचा(Love Jihad) संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे लव्ह जिहादचा मुद्दा एकदा चर्चेत आला आहे.  लव्ह जिहादमध्ये राज्यातून बेपत्ता मुलींचा शोध घेतला जाणार असल्याची घोषणा राज्याचे महिला आणि बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा(
Minister for Women and Child Development Mangalprabhat Lodha) यांनी केली आहे.    

महिला आयोगाद्वारे विशेष पथक स्थापन करून या बेपत्ता मुलींचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिली. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. श्रद्धा वालकर प्रकरणात लव्ह जिहादचाही आरोप केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या गायब झालेल्या मुलींचा शोध घेतला जाणार असल्याचे लोढा यांनी जाहीर केले आहे.

लव्ह जिहाद संदर्भात कायदा आणणार

लव्ह जिहाद रोखण्यासाठी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात विशेष कायदा लागू करण्यात आला आहे. या धर्तीवर आता महाराष्ट्र सरकारने  देखील लव्ह जिहाद(Law against Love Jihad) विरोधात कायदा आणण्याची तयारी सुरु केली आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी कायदा मांडला जाणार असल्याची माहिती माजी मंत्री व आमदार प्रवीण पोटे(Former Minister and MLA Praveen Pote) यांनी दिली आहे. या नविन लव्ह जिहाद कायद्याअंतर्गत गैरकृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाईची तरतूद असणार आहे.