चालत्या ट्रेनमध्ये स्टंट करणारी महिला कॅमेऱ्यात कैद

चालत्या लोकलमध्ये महिलेचा स्टंट

Updated: Sep 4, 2018, 12:37 PM IST
चालत्या ट्रेनमध्ये स्टंट करणारी महिला कॅमेऱ्यात कैद title=

मुंबई : मुंबईच्या लोकलमध्ये चालत्या रेल्वेमधून स्टंट करणारे अनेक तरुण तुम्ही पाहिले असतील. लोकलमध्ये स्टंट करणारे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले देखील असतील. पण आता जो व्हिडिओ समोर आला आहे त्यात स्टंट करणारी एक महिला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतं आहे. हा व्हिडिओ रे रोड आणि कॉटन ग्रीन स्टेशनच्या दरम्यानचा असल्याचं बोललं जातंय. 

एक महिला ट्रेनच्या दरवाजाजवळ उभी राहून हा स्टंट करत आहे. या दरम्यान ती खांब्यांना पकडण्याचा प्रयत्न करत आहे. शेवटी ही महिला चालत्या ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर उतरतांना दिसत आहे.

रेल्वे पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून या महिलेचा शोध घेत आहे.