Maha Vikas Aghadi Morcha : महाविकास आघाडीकडून 'या' 5 कारणांसाठी मोर्चाची हाक

Maha Vikas Aghadi Morcha : राज्यामध्ये सत्तांतरानंतर राजकीय नाट्याचे विविध अंक पाहायला मिळाले. त्यातलाच आणखी एक अंक आज पार पडणार आहे. 

Updated: Dec 17, 2022, 08:07 AM IST
Maha Vikas Aghadi Morcha : महाविकास आघाडीकडून 'या' 5 कारणांसाठी मोर्चाची हाक title=
why Maha Vikas Aghadi Morcha is happening know the reasons

Maha Vikas Aghadi Morcha : राज्यामध्ये सत्तांतरानंतर राजकीय नाट्याचे विविध अंक पाहायला मिळाले. त्यातलाच आणखी एक अंक आज पार पडणार आहे. अर्थात महाविकास आघाडीनं आज (शनिवारी) मुंबईत हल्लाबोल मोर्चाची हाक दिली आहे. महापुरूषांच्या अवमानाप्रकरणी आज महाविकास आघाडीनं या मोर्चाची हाक दिली ज्यामध्ये शिवसेना (Shivsena) ठाकरे गट, राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसचे (Congress) पदाधिकारी आणि नेते सहभागी होणार आहेत. या मोर्चाची आणखीही काही कारणं आहेत जाणून घ्या ती कारणं नेमकी कोणती.... 

- छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या आणि अशा अनेक महामानवांचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकवणं. 

- मिंध्या सरकारला वठणीवर आणत महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान जपण्यासाठी.  

- राज्यातील कष्टकऱ्यांचे आणि नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी. आरक्षण, संरक्षण आणि इतर सुविधांचे प्रश्न प्रकाशात आणण्यासाठी.   

- संकटांच्या कचाट्यात सापडलेल्या बळीराजाचे प्रश्न निकाली काढून त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी. 

हेसुद्धा वाचा : Maha Vikas Aghadi Morcha : आज मुंबईतले 'हे' रस्ते बंद; महाविकास आघाडीचा मुंबईत हल्लाबोल

 

वरील कारणांव्यतिरिक्त इतरही काही कारणांच्या पार्श्वभूमीवर या बंदची हाक देण्यात आली आहे. यामध्ये जनतेचा आवाज उठवत त्यांना हुकूमशाहीविरोधात आवाज उठवण्यासाठी एकवटणं हासुद्धा या मोर्चाचा हेतू आहे. यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असेल. तो म्हणजे महाराष्ट्रातील अनेक मोठे उद्योग परराज्यात नेणाऱ्यांना जाब विचारणं. राज्यातील तरुणांच्या रोजगाराचा प्रश्नही या मोर्चातून सत्ताधाऱ्यांना विचारला जाणार आहे. 

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वाहतुक मार्गांमध्ये बदल 

मविआच्या महामोर्चासाठी मार्गात बदल करण्यात आले आहेत, या धर्तीवर रिचर्डसन्स क्रुडास मिल, सर जे.जे. उड्डाणपूल डॉ. दादाभाई नौरोजी रोड, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे रस्ते बंद असेतील. तर, भायखळ्यातून दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाटेतही बदल करण्यात आले आहेत. भायखळा, लालबागमधूनही दक्षिण मुंबईकडे येणाऱ्या मार्गात बदल करण्यात आला आहे.