मुंबई : सचिन वाझे, प्रकरणानंतर मुंबई पोलीस आयुक्तपदी असलेल्या परमबीर सिंग यांची उचलबांगडी करुन त्या जागी, हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पोलीस आयुक्तपदी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हेमंत नगराळे हे महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी होते, हे पद मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या दर्जाचंच असल्याने, त्यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्तपदाची सू्त्र सोपवण्यात आली आहे.
हेमंत नगराळे हे १९८७ च्या बॅचचे पोलीस अधिकारी आहेत. हेमंत नगराळे हे २०१६ मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तपदी होते. यानंतर नगराळे यांची २०१८ मध्ये नागपुरात बदली झाली. हेमंत नगराळे महासंचालकपदी होते.
मुंबईच्या पोलीस आयुक्तपद हे डीजी दर्जाचं आहे. त्याच दर्जाचा अधिकारी या पदावर असावा म्हणून नगराळे यांच्याकडे हे पद सोपवण्यात आलं आहे. कोण आहेत नगराळे? कशी आहे त्यांची कारकिर्द याचा घेतलेला हा आढावा.
हेमंत नगराळे हे नवी मुंबई पोलीस आयुक्तपदी असताना त्यांनी वाशीतील बँक ऑफ बडोदा दरोड्याचा छडा लावला होता. हा दरोडा त्यांनी ४८ तासांच्या आत उघड केला होता. जस्टीन बिबर आणि क्रीडा स्पर्धेत त्यांनी चांगली कायदा व सुव्यवस्था ठेवली होती.
हेमंत नगराळे यांचं २०१८ साली हेमंत नगराळे यांचं निलंबन करण्यात आलं होतं. कारण शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात नगराळे यांनी गुन्हा दाखल केला होता. विधान परिषदेच्या आमदारावर सभापती यांच्या परवानगीशिवाय हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा बेकायदेशीर निर्णय घेतल्याने उपायुक्त तुषार दोषी आणि हेमंत नगराळे यांना निलंबित करण्याचे आदेश. सभापती रामराज नाईक-निंबाळकर यांनी दिले होते.
पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात हेमंत नगराळे यांची तक्रार मुख्यमंत्र्यांपर्यंत करण्यात आली होती. तसेच एका बांधकाम व्यावसायिकाचे संरक्षण काढून घेण्यात आले होते, या न्यायालयाने नगराळेंवर ताशेरे ओढले होते.
हेमंत नगराळे यांना निवृत्तीसाठी अजूनही १९ महिने आहेत. तेव्हा हेमंत नगराळे यांना कोणताही वादमध्ये न आल्यास मुंबई पोलीस आयुक्तपदी जास्तच जास्त दिवस राहण्याची संधी मिळणार आहे.