गुंतवणूक करण्याआधी हा विचार नक्की करा... येत्या २० ते ३० वर्षात १ कोटीची किंमत रुपयांमध्ये किती असेल?

भविष्यात 1 कोटीचे मूल्य किती असेल?

Updated: Jun 24, 2021, 07:53 PM IST
गुंतवणूक करण्याआधी हा विचार नक्की करा... येत्या २० ते ३० वर्षात १ कोटीची किंमत रुपयांमध्ये किती असेल?  title=

मुंबई :  सुरक्षित आणि समाधानी भविष्याच्या दृष्टीकोनातून अनेक जण गुंतवणूक (Future Investments) करतात. उतार वयात 1 कोटीचं फंड हवं असल्यास अनेक SIP स्कीम्स उपलब्ध आहेत. एसआयपी कॅलक्युलेटरच्या मदतीने सहज समजेल की दरमहा किती रक्कम गुंतवावी लागेल अन नंतर किती परतावा मिळेल. उदाहरण, जर तुम्ही दरमहा 10 हजार रुपये गुंतवत असाल अन त्याचा 12 टक्के वार्षिक परतावा असेल, तर 20 वर्षानंतर तुमचं फंड 1 कोटी इतकं होईल. (What will the value of 1 crore be in rupees in the next 20 to 30 years)

अनेक जण गुंतवणूकीपूर्वी एक बाब हमखास विसरतात ती म्हणजे महागाई दर. सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास, आज 1 कोटी रुपयांची जितके बाजारमूल्य आहे, तेच मूल्य 10 ते 40 वर्षानंतर  नसेल. त्यामुळे भविष्यात 1 कोटीचे मूल्य किती असेल, हे जाणून घेणं महत्वाचं आहे. महागाईमुळे मूल्य दरात घटत जाते. सोप्या भाषेत आज 1 लाखांत आपण जितकी खरेदी करतोय, तितकीच खरेदी 1 लाख रुपयांमध्ये 10 वर्षांनंतर करता येणार नाही. उलटपक्षी आजपासून 10 वर्षांपूर्वी अधिक खरेदी करु शकत होतात.

भविष्यात 1 कोटीचे मूल्य किती? 

जर महागाई दर 5 टक्के असेल कर 1 कोटीचे मूल्य हे 15 वर्षानंतर 48 लाख रुपये इतके राहिल. तर हेच मूल्यदर 20 वर्षांनंतर 37 लाख 68 हजार,  25 वर्षांनंतर 29 लाख 53 हजार आणि 30 वर्षानंतर 1 कोटीची किंमत ही  23 लाख 13 हजार रुपये इतकी असेल. ही आकडेवारी 5 टक्के महागाई दर या हिशोबाने काढण्यात आली आहे.  

5-6 टक्के महागाई दर राहण्याचा अंदाज 

गुंतवणूक तज्ज्ञांनुसार, येत्या काही वर्षांमध्ये महागाई दर 5 ते 6 टक्के राहण्याचा अंदाज आहे. रिझर्व्ह बँकेने नुकतेच पुढील 5 वर्षांसाठी महागाई दर 4 टक्के इतका कायम ठेवलं आहे. यामध्ये  +/- 2 टक्क्यांचं ब्रॅकेट ठेवण्यात आला आहे. लॉन्ग टर्म मेडिकल आणि एजुकेशनल महागाईत वेगाने महागाई होते. यामुळे जर पाल्यांसाठी गुंतवणूक करत असाल, तर ही बाब लक्षात ठेवायला हवी.

समजा वर्तमान स्थितीत MBA ची फी 15 लाख रुपये आहे. जर तुम्ही पाल्यांच्या उज्वल भविष्यासाठी बचत करत असाल, तर 20 वर्षांनंतर 7 टक्के महागाई दराने ही किंमत 40 लाख रुपये इतकी असेल. त्यामुळे तुमचं लक्ष 15 ऐवजी  40 लाख इतकं असायला हवं.   

संबंधित बातम्या  : 

Gold Rate | सोने खरेदीसाठी 'सुवर्णसंधी', इतक्या रुपयांची घट, जाणून घ्या नवे दर

देशातील 'हे' आहे सर्वात महागडे शहर, जगात 78वा क्रमांक

रोज 500 रुपयांची गुंतवणूक, 1 कोटींपेक्षा जास्त होतील जमा ! जाणून घ्या काय करावे ?