तो वादग्रस्त व्हिडीओ त्वरीत हटवण्यासाठी यूट्यूबशी संपर्क - राज्याचे गृहमंत्री

नवी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वादग्रस्त व्हिडिओ बनवण्यात आलाय.

Updated: Jan 21, 2020, 05:03 PM IST
तो वादग्रस्त व्हिडीओ त्वरीत हटवण्यासाठी यूट्यूबशी संपर्क - राज्याचे गृहमंत्री title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपात, तर गृहमंत्री अमित शाह यांना तानाजी मालुसरेंच्या रुपात दाखवणारा वादग्रस्त व्हिडिओ तातडीनं हटवावा, यासाठी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यूट्युबशी संपर्क साधलाय. या व्हिडिओबाबत महाराष्ट्र सरकारकडे तक्रारी प्राप्त झाल्यात. त्यानुसार व्हिडिओ हटवण्याची सूचना यूट्युबला करण्यात आलीय. 

नवी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वादग्रस्त व्हिडिओ बनवण्यात आलाय.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर पंतप्रधान मोदींचा चेहरा चिकटवण्यात आलाय. तर तानाजींना अमित शाहांचा चेहरा लावण्यात आला आहे. आता त्यावरुन जोरदार वादंग सुरू झालं आहे.