विद्यार्थिनीचा महिला वॉर्डनवर लैंगिक अत्याचाराचा आरोप

विद्यार्थिनीने महिला वॉर्डनविरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार केली

Updated: Oct 14, 2018, 10:21 PM IST
विद्यार्थिनीचा महिला वॉर्डनवर लैंगिक अत्याचाराचा आरोप title=

मुंबई : एसएनडीटी विद्यापीठाच्या जुहू कॅम्पसमधील विद्यार्थिनीने महिला वॉर्डनविरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार केली आहे. या घटनेविरुद्ध आवाज उठवण्यासाठी विद्यार्थिनींचे आंदोलन विद्यापिठात सुरू आहे. पोलीस सध्या घटनेचा तपास करत आहेत. 

कपडे काढण्यास सांगितले ?

विद्यार्थीनी आणि महिला वॉर्डनमध्ये हा वाद सुरू होता. अंगावर एलर्जी आल्याची समस्या घेऊन महिला वॉर्डनकडे गेलेल्या विद्यार्थिनिला कपडे उतरवण्यास सांगितल्याची तक्रार आहे.

यासंदर्भात पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

या घटनेची गंभीर दखल घेत जवळपास ४०० मुली वॉर्डन विरोधात आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. 

चौकशी सुरू 

एसएनडीटी विद्यापीठाकडे विद्यार्थिनींनी अधिकृत तक्रार दिली आहे. वसतीगृहाच्या वॉर्डनविरोधात तक्रार असून चौकशी सुरु असल्याचे विद्यापीठ प्रशासनातर्फे सांगण्यात आलंय.