मुंबई : सोमवारी धारावी येथे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. दहावी बारावी बोर्डाची परीक्षा घेण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध करत विद्यार्थ्यांनी आक्रमक आंदोलनं केले होते. या आंदोलनाला चिथावणी देणाऱ्या हिंदुस्थानी भाऊला धारावी पोलिसांनी अटक केली आहे.
हिंदुस्थानी भाऊ नावाने सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेल्या विकास पाठक यांनीच दहावी आणि बारावीच्या मुलांना आंदोलनासाठी चिथावणी दिली, असा त्यांच्यावर आरोप आहे.
हिंदुस्थानी भाऊ यांच्या व्हिडिओनंतर हे आंदोलन भडकल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक करण्यात आलं आहे.
Mumbai: Social media influencer Vikas Fhatak, also known as 'Hindustani Bhau', arrested by Dharavi Police in connection with students' protest in Dharavi y'day over their demand for online exams for classes 10th & 12th, in view of #COVID19. FIR registered against Fhatak & others.
— ANI (@ANI) February 1, 2022
विद्यार्थी हे निरागस असतात, ही मुलं अठरा वर्षांच्या खालील आहेत. हे विद्यार्थी एके ठिकाणी कोरोनाशी लढतायत, दुसऱ्या ठिकाणी अभ्यासाशी लढतायत.
भविष्याच्या दृष्टीकोनातून विचार केला तर मागील दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांचं खूप नुकसान झालं आहे. भविष्यात या मुलांना त्रास होऊ नये म्हणून ही परीक्षा घेऊन अकरावी प्रवेश सुरुळीत करता यावा म्हणून हा आमचा उद्देश असल्याचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.
विद्यार्थ्यांना भडकावू नका, चर्चा किंवा काही सूचना करायची असेल तर राज्य सरकारशी करावं असं आवाहन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.
संघटनांचं काय म्हणणं आहे त्याविषयी आमच्या चर्चा करावी, आज दहावी आणि बारावीला तीस लाख विद्यार्थी आहेत. महाराष्ट्राच्या भौगलिक परिस्थितीचा विचार करावा आणि काय समस्या असतील तर आमच्याशी चर्चा करावी, असं आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.
कोरोना असताना विद्यार्थ्यांना बाहेर का आणलं असा सवाल वर्षा गायकवाड यांनी विचारल आहे.