मुलाने बेघर केलेल्या विजयपत सिंघानियांनी केले हे हतबल वक्तव्य !

विजयपत सिंघानिया आणि गौतम सिंघानिया  या पिता पुत्रांचे वाद आता चव्हाटयावर आले आहे.

Updated: Aug 16, 2017, 04:11 PM IST
मुलाने बेघर केलेल्या विजयपत सिंघानियांनी केले हे हतबल वक्तव्य ! title=

मुंबई : विजयपत सिंघानिया आणि गौतम सिंघानिया  या पिता पुत्रांचे वाद आता चव्हाटयावर आले आहे.

रेमंड समुहाचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांना त्यांच्याच मुलाने घराबाहेर काढल्याने विजयपत सिंघानियांनी गौतमविरोधात खटला दाखल केला आहे. 

'मुलाच्या प्रेमात मी आंधळा झालो होतो.  त्याच्या प्रेमापोटी सारे शेअर्स त्यांच्या नावावर केले. आणि आता माझ्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे. अशी खंत विजयपत सिंघानिया यांनी व्यक्त केली आहे.  

उद्योगपती विजय सिंघानिया आणि गौतम सिंघानिया यांच्यामध्ये सद्ध्या संपत्तीवरून वाद सुरू आहेत. त्यांनी गौतमवर फसवणूकीचे आरोप केले आहेत. हा वाद सामोपचाराने मिटावा असे विजयपत यांना वाटते पण गौतम अजूनही त्याच्या भूमिकेवर ठाम आहे . ' गौतमने तिरूपती बालाजीची शपथ घेऊन सांगावे मी खोटा आहे. तसे झाल्यास मी स्वतः खटला मागे घेईन .' असे  विजयपत सिंघानिया हतबलतेने म्हणाले.